घटक चाचणी -I इ. 6 वी विज्ञान महत्वाची प्रश्नोत्तर (मराठी)
घटक चाचणी- I (1 ते 5 पाठांवर आधारित)
महत्वाची प्रश्नोत्तरे:
प्र.1.अ. कंसातील योग्य शब्द वापरुन रिक्त जागा भरा.
(ऑक्सीजन, मृत्यू, जैविक, उत्सर्जन, अजैविक, 0.3, कार्बन डाय ऑक्साईड, चेतनाक्षमता, प्रकाशसंश्लेषण, अतिनील)
(1) स्वत: चे अन्न स्वत: तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाशसंश्लेषण म्हणतात.
(2) शरीरात ऑक्सीजन वायू घेणे आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे याला श्वसन म्हणतात.
(3) शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय.
(4) घडलेल्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता म्हणतात.
(5) आयुर्मान पूर्ण झाल्यावर प्रत्येक सजीव मृत्यू पावतो.
(6) ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो.
(7) पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण 0.3 टक्के साठा उपलब्ध आहे.
(8) मृदेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते.
आ. योग्य जोड्या लावा.
गट 'अ' गट 'ब'
(1) कार्बन डायऑक्साईड (अ) मृदेची निर्मिती
(2) ऑक्सीजन (ब) पाऊस
(3) बाष्प (क) वनस्पती व अन्ननिर्मिती
(4) सूक्ष्मजीव (ड) ज्वलन
(5) उभयचर (ई) माकड
(6) पृष्ठवंशीय (च) साप
(7) खवले असणारे (छ) बेडूक
उत्तर:
(1) कार्बन डायऑक्साईड (क) वनस्पती व अन्ननिर्मिती
(2) ऑक्सीजन (ड) ज्वलन
(3) बाष्प (ब) पाऊस
(4) सूक्ष्मजीव (अ) मृदेची निर्मिती
(5) उभयचर (छ) बेडूक
(6) पृष्ठवंशीय (ई) माकड
(7) खवले असणारे (च) साप
क. सत्य की असत्य ते लिहा.
(1) जमीन आणि मृदा ही एकच आहे. – असत्य
(2) जमिनीखालील पाण्याला भूजल असे म्हणतात. - सत्य
(3) मृदेचा २५ सेंमी जाड थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. - असत्य
(4) जाहिरातीसाठीच्या दिव्यांमध्ये रेडॉन चा वापर केला जातो. - असत्य
(5) गोगलगाय हा जलचर प्राणी आहे. – असत्य
(6) उभयचर हवेत व पाण्यात राहू शकतात. - असत्य
(7) मेंदूचे कार्य पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये चांगले विकसित होते. - सत्य
(8) अमीबा हा बहुपेशीय प्राणी आहे. - असत्य
ड. मी कोण?
(1) मी थर्मामीटरमध्ये आढळतो; मी तुमचे तापमान मोजतो. -पारा
(2) माझ्याशिवाय थंड नाही गरम नाही. -उष्णता
(3) माझा काहीच आकार नाही! -वायू
(4) मी पाण्यात विरघळतो, पण रॉकेलमध्ये विरघळत नाही. -सोडियम
प्र.2.अ. त्यांना श्वास घेण्यास कशामुळे मदत होते?
(1) मासा - कल्ले
(2) साप - फुफ्फुसे
(3) करकोचा - फुफ्फुसे
(4) गांडूळ – त्वचा
(5) मानव - फुफ्फुसे
(6) वडाचे झाड – पानांवरील छिद्रातून
(7) अळी – श्वसनछिद्रे
आ. प्रत्येकी एक नाव लिहा.
(1) सपुष्प वनस्पती: आंबा, जास्वंद. गुलाब
(2) अपुष्प वनस्पती: शेवाळ, नेचे.
(3) वृक्ष: सागवान, कडुनिंब, वडाचे झाड.
(4) झुडप: कन्हेरी, घाणेरी.
(5) वेल:: भोपळा, कलिंगड, काकडी.
(6) वार्षिक वनस्पती: सूर्यफूल, ज्वारी, गहू.
(7) द्विवार्षिक वनस्पती: गाजर, बीट.
(8) बहुवार्षिक वनस्पती: आंबा, कडुनिंब, फणस.
(9) जीवावरणाचे घटक : प्राणी, वनस्पती.
(10) मृदेचे जैविक घटक: सूक्ष्मजंतू, कीटक, उंदीर.
(11) जीवाश्म इंधन : पेट्रोल, डिझेल, रॉकेल.
(12) हवेतील निष्क्रिय वायू: अर्गॉन, हेलियम, नियॉन, क्रिप्टाॅन, झेनॉन.
(13) ओझोन थराला हानिकारक असणारे वायू: क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन टेट्राक्लोराईड.
इ. वेगळा कोण ओळखा?
(1) बुरशी, भुछत्र, शेवंती, स्पायरोगायरा: शेवंती
(2) आंबा, वड, ताड, हरभरा: ताड
(3) द्राक्ष, संत्रे, लिंबू, जास्वंद: जास्वंद
(4) सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी: वड
(5) पेरू, मुळा, गाजर, बीट: पेरू
(6) हरीण, मासे, मानव, कृमी: मासे
ड. खालीलपैकी आपत्कालीन संपर्क क्रमांक कोणते आहेत?
(1) पोलिस नियंत्रण कक्ष- 100
(2) फायर ब्रिगेड- 101
(3) रुग्णवाहिका- 102
(4) आपत्ती निवारणासाठी राष्ट्रीय स्तरावरील एकच आपत्कालीन क्रमांक.- 108
उ. खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या शब्दात लिहा.
(1) हवेचे विविध घटक कोणते आहेत?
उत्तर : हवेचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत.
नायट्रोजन. ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड, अर्गॉन, बाष्प, धुळीचे कण.
(2) वनस्पतीचे भाग कोणते?
उत्तर: वनस्पतींचे सामान्यत: सहा मूलभूत भाग असतात: मुळे, खोड, पाने, फुले, फळे आणि बिया.
(3) कोणत्या इंजेक्शनमुळे कुत्रा चावणे बरे होऊ शकते?
उत्तर: अँटी रेबीज लसीचे इंजेक्शन घेतल्यामुळे कुत्र्यांचा दंश बरा होऊ शकतो.
(4) आपत्तींचे प्रकार काय आहेत?
उत्तर: नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती असे आपत्ती चे दोन प्रकार आहेत.
----The End----