इ. 7 वी सामान्य विज्ञान महत्वाचे प्रश्न – द्वितीय सत्र

 

इ. 7 वी सामान्य विज्ञान महत्वाचे प्रश्न – द्वितीय सत्र


 

प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा

(1) पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात

(2) दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते. 

(3) साबण हा तेलाम्ल सोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे

(4) संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात

(5) बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते

(6) लवक हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते. ** 

(7) सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खता मध्ये रूपांतर होते

(8) हरितलवका पेशीमध्ये मुळे प्रकाश-संश्लेषण होते

(9) सूक्ष्मजीव/पेशी अंगकाच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो.

(10) पचनाची क्रिया मुख पासून सुरू होते.

(11) पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात.

(12) स्नायूसंस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही.

(13) हृदयाचे स्नायू हे हृद् स्नायू असतात.

(14) बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिका चे कार्य आहे.

(15) रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास प्रच्छाया उपच्छाया या छाया पाहता येतात

(16) चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी ची सावली चंद्रा वर पडते

(17) सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रा ची सावली पृथ्वी वर पडते

(18) सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी विकिरणा  मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.

(19) कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो

(20) ध्वनीची वारंवारिता हर्ट्झ मध्ये मोजतात

(21) ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो

(22) ध्वनीच्या प्रसारणासाठी साठी माध्यमाची आवश्यकता असते

(23) औदयोगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपरमॅग अल्निको उपयोग केला जातो

(24) चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा पाणी  यांमधून आरपार जाऊ शकते

(25) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बल रेषांच्या साहाय्याने दर्शवतात

(26) चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे

(27) दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला क्षितिज म्हणतात

(28) राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे

(29) ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात

(30) सूर्याचे पूर्वेस उगवणे पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे

प्रश्न 2. जोड्या जुळवा

 '' गट             '' गट 

(1) हृद् स्नायू                       (a) नेहमीच जोडीने कार्य करतात

(2) स्नायूंमुळेच होतात               (b) आम्ही कधीच थकत नाही

(3) पेप्सिन                           (c) स्नायूंचे अनियंत्रित वेदनामय आकुंचन,

(4) पेटके येणे                       (d) जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली

(5) अस्थिस्नायू                     (e) जाठररसातील विकर

(6) स्टेनलेस स्टील                  (f) अधातू 

(7) चांदी                            (g) संयुग 

(8) भाजणीचे दळण                (h) मिश्रण 

(9) मीठ संमिश्र                     (i) मूलद्रव्य 

(10) कोळसा                       (j) संमिश्र 

(11) हायड्रोजन                     (k) धातू 

(12) बासरी                         (l) वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी 

(13) वारंवारिता                    (m) वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त 

(14) ध्वनीची पातळी               (n) हवेतील कंपने 

(15) श्राव्यातीत ध्वनी               (o) Hz मध्ये मोजतात

(16) अवश्राव्य ध्वनी               (p) डेसिबेल 

(17) होकायंत्र                      (q) सर्वाधिक चुंबकीय बल 

(18) कपाटाचे दार                 (r) सजातीय ध्रुव 

(19) प्रतिकर्षण                    (s)  चुंबक 

(20) चुंबकीय ध्रुव                 (t)  सूचीचुंबक 

उत्तरे :

(1) हृद् स्नायू        - आम्ही कधीच थकत नाही

(2) स्नायूंमुळेच होतात - जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली

(3) पेप्सिन - जाठररसातील विकर

(4) पेटके येणे - स्नायूंचे अनियंत्रित वेदनामय आकुंचन

(5) अस्थिस्नायू - नेहमीच जोडीने कार्य करतात

(6) स्टेनलेस स्टील - संमिश्र 

(7) चांदी - धातू 

(8) भाजणीचे दळण - मिश्रण 

(9) मीठ - संयुग 

(10) कोळसा - मूलद्रव्य                   

(11) हायड्रोजन - अधातू 

(12) बासरी - हवेतील कंपने 

(13) वारंवारिता - Hz मध्ये मोजतात 

(14) ध्वनीची पातळी - डेसिबेल 

(15) श्राव्यातीत ध्वनी - वारंवारिता 20000 Hz पेक्षा जास्त 

(16) अवश्राव्य ध्वनी - वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी

(17) होकायंत्र - सूचीचुंबक 

(18) कपाटाचे दार - चुंबक 

(19) प्रतिकर्षण - सजातीय ध्रुव 

(20) चुंबकीय ध्रुव - सर्वाधिक चुंबकीय बल 

प्रश्न 3. खोटे कोण बोलतोय

(1) जीभ : माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात.

उत्तरे : जीभ सर्व चवी ओळखू शकते; म्हणून जीभ खोटे बोलत आहे

(2) यकृत : मी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे

उत्तरे : यकृत खरे बोलते

(3) मोठे आतडे : माझी लांबी 7.5 मीटर आहे

उत्तरे : मोठे आतडे खोटे बोलते; त्याची लांबी 1.5 मीटर आहे

(4) अॅपेंडिक्स : पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही

उत्तरे : अॅपेंडिक्स खोटे बोलतो; कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करीत नाही

(5) फुप्फुस : उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो

उत्तरे : फुप्फुस थोडेसे खोटे बोलतो; त्याचाही उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो, परंतु वृक्का (Kidney) 

इतका नाही

प्रश्न 4. पुढे दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारांत मोडतात

(1) दुधाचे दही होणे. – रासायनिक, अपरिवर्तनीय, सावकाश

(2) फटाका फुटणे. – रासायनिक, अपरिवर्तनीय, शीघ्र

(3) भूकंप होणे. - भौतिक, रासायनिक, अपरिवर्तनीय, नैसर्गिक

(4) पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण. - आवर्ती; सावकाशनैसर्गिक

(5) स्प्रिंग ताणणेभौतिक, परिवर्तनीय.

प्र .5.  Zn, Cd, Xe, Br, TI, Cu, Fe, St, Ir, PI या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा

संज्ञा

मूलद्रव्य

संज्ञा

मूलद्रव्य

Zn

झिंक 

Cu

कॉपर / तांबे 

Cd

कॅडमिअम 

Fe

आयर्न / लोह 

Xe

झेनॉन 

Si

सिलिकॉन 

Br

ब्रोमिन

Ir,

इरिडिअम 

Ti

टीटानिअम 

Pt

प्लॅटिनम

 प्रश्न 6. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत

संयुग

रेणुसूत्र

हायड्रोक्लोरिक आम्ल 

HCL

सल्फ्युरिक आम्ल 

H2SO4

सोडिअम क्लोराइड 

NaCl

ग्लुकोज 

C6H12O6

मिथेन 

CH4

 

 प्रश्न 7. एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) पेशी म्हणजे काय?

उत्तर: सर्व संजीवांचा रचनात्मक कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणे पेशी होय.

2) सूक्ष्मजीव म्हणजे काय?

उत्तर: आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात.

3) स्नायू मुखत: किती प्रकारचे असतात कोणते?

उत्तर: स्नायू मुखत: तीन प्रकारचे असतात.

        1. अस्थि स्नायू किंवा ऐच्छिक स्नायू.

        2. हृदयाचे स्नायू किंवा हृद स्नायू.

        3. मृदु स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू.

4) आम्लपित्त का होते ? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ?

उत्तर: जठर आम्ल तयार करते आणि पित्तरस यकृत तयार करते. दोन्हीचे सामू निरनिराळे आहेत. परंतु आम्लपित्त हा शब्द आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरला जातो. याच्याप्रमाणे आम्लपित्त वाढले की डोके दुखते, उलट्या होतात, अंगावर पुरळ उठते इत्यादी. काही लोक आम्लपित्ताला अॅसिडीटी असेही म्हणतात.

5) हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती ?

उत्तर : ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, अर्गोन, क्रिप्टॉन, झेनॉन इत्यादी मूलद्रव्ये हवेमध्ये आहेत.

6) सिमेंटमधील घटक कोणते

उत्तर : साध्या सिमेंटमध्ये सिलिका (वाळू), ॲल्युमिना (अॅल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) यांचे मिश्रण असते, तर पोर्टलंड सिमेंटमध्ये 60% चूना (कॅल्शिअम ऑक्साईड), 25% सिलिका (सिलिकॉन डायऑक्साइड), 5% ॲल्युमिना उरलेला भाग आयनें ऑक्साइड मग्नेशिया ने बनलेला असतो.

7) खनिज तेलापासून कोणकोणते घटक पदार्थ मिळतात, त्यांची यादी करा

उत्तर : पेट्रोलिअम हे हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगांचे मिश्रण असते. त्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधकाची संयुगे असतात. पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक खनिज तेलापासून मिळतात.

8) बिंदुस्रोतामुळे उपच्छाया का मिळत नाही

उत्तर : बिंदुस्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळे त्याच्यासमोर असलेल्या वस्तूची केवळ गडद छाया मिळते.

9) ध्वनीच्या वारंवारितेनुसार किंवा ऐकू येण्यानुसार कोणते प्रकार पडतात

उत्तर : ध्वनीच्या वारंवारितेनुसार किंवा ऐकू येण्यानुसार पुढील 3 प्रकार पडतात :

(1) अवश्राव्य ध्वनी : वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी असलेला ध्वनी.

(2) श्राव्य ध्वनी : वारंवारिता 20 Hz ते 20000 Hz असलेला ध्वनी.

(3) श्राव्यातीत ध्वनी : वारंवारिता 20000 Hz पेक्षा अधिक असलेला ध्वनी

10) तारकासमूह म्हणजे काय

उत्तर : खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या  ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात

11) आकाश निरीक्षणामध्ये ध्रुवतारा का महत्त्वाचा आहे

उत्तर : ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवतो. सप्तर्षीच्या तारकासमूहावरून ध्रुव तारा शोधता येतो. तसेच शर्मिष्ठेच्या निरीक्षणावरून देखील ध्रुवतारा दिसून येतो. ध्रुवताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी, तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात. त्यामुळे ध्रुवताऱ्याच्या निरीक्षणावरून इतरही तारकासमूहांची निरीक्षणे करता येतात

प्रश्न 8. कारणे लिहा

1) जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते

उत्तर : जठराच्या भित्तिकेत जाठरग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते

2) घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.

उत्तर : तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यांची वाढ 15 °C ते 35 °C याच तापमानात होऊ शकते. शीतकपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी शीतकपाटांचा वापर केला जातो

3} ताकापासून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते

उत्तर : घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे. ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात. घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एकच गोळा बनतो. लोणी वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते

4) मादक पदार्थांचे सेवन करू नये.

उत्तर : मादक पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते. म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये

5) पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते

उत्तर : पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जवळजवळ निर्वात पोकळी असल्यामुळे सूर्यप्रकाश विखुरण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते. परिणामी अवकाश काळे दिसते.

6) उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये

उत्तर : सूर्याची हानिकारक अतिनिल किरणे सतत पृथ्वीवर येत असतात. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येतच असतात. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यांत शिरून दृष्टीचे नुकसान होते. म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये

7) आकाश दिवसा निळे दिसते.

उत्तर : नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूंचे रेणू सूर्यप्रकाशाचे विकिरण करतात. या वेळी निळ्या प्रकाशाचे विकिरण सर्वाधिक होते. म्हणून, आकाश दिवसा निळे दिसते.

8) चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही

उत्तर : ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर ती त्याला ऐकू जाणार नाही


 प्रश्न 9. पुढील ओघतक्ता पूर्ण करा.

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Maharashtra State Board Exercises ( Semi/Marathi)

5 वी परिसर अभ्यास - 1 5th EVS (Semi) 6th General Science (Semi) 7th General Science (Semi) 6वी सामान्य विज्ञान (मराठी माध्यम) 7 वी सामान्य व...