प्रथम सत्र - महत्वाची प्रश्नोत्तरे - इ. 6 वी सामान्य विज्ञान (मराठी)

 प्रथम सत्र 

इ - 6 वी

विषय- सा. विज्ञान

गुण- 40

प्र.1.. रिक्त जागा भरा.     

1.     न्यूयॉर्क  लंडन येथे नायलॉन हा कृत्रिम धागा तयार झाला.

2.     मानवी त्वचेचे अंत:त्वचा   बाह्यत्वचा  हे दोन थर आहेत.

3.     रेयॉनला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते.


4.   व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर मानव निर्मित पदार्थ आहे.

5.    मानवी अस्थिसंस्था दोन भागांत विभागली जाते.

6.    अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात.

7.      बाह्यत्वचेच्या थरांमधील पेशींत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते.

8.    कर्बोदके स्निग्ध पदार्थपासून शरीराला ऊर्जा मिळते.

9.    संतुलित आहारात सर्व पोषकतत्त्वांचा योग्य प्रमाणात समावेश असतो.

10.   गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने स्थूलपणा येतो.

11.   शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषक तत्वे म्हणतात.

12.  ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील  किरणे शोषून घेतो.

             

. योग्य पर्याय निवडा.

1) पा्यांची  हातांची बोटे यांत ........ प्रकारचा सांधा असतो.

() बिजागिरीचा सांधा          उखळीचा सांधा

() अचल सांधा                        सरकता सांधा

             उत्तर:   () बिजागिरीचा सांधा 

         2) या पदार्थापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते.

() तृणधान्ये                () पालेभाज्या

() पाणी                     () आवळा

            उत्तर:  (तृणधान्ये

) या खनिजाच्या अभावाने गलगंड हा आजार होतो.

() लोह                () कॅल्शिअम

() आयोडीन           () पोटॅशिअम

            उत्तर: (आयोडीन   

4) याचा जंक फूडमध्ये समावेश होतो.

() संत्री                () दूध

() भाकरी              () चॉकलेट

             उत्तर:   (चॉकलेट

5) शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे ... ........

() उत्सर्जन संस्था                () श्वसन संस्था

(अस्थिसंस्था             () रक्ताभिसरण संस्था

             उत्तर:   (अस्थिसंस्था 

6) डाळींपासून पुढील पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात.

(कर्बोदके            (स्निग्ध पदार्थ

(प्रथिने               (खनिजे

            उत्तर: (प्रथिने  

. सांगा मी कोणाशी जोडी लावू?  

गट             उत्तरे                   गट

1.    उखळीचा सांधा          (         )                . गुडघा

2.    थबजाथगरीचा सांधा      (         )                . मनगट

3.    सरकता सांधा            (         )                . खांदा

4.    कार्बन डायॉक्साइड       (         )                . मृदेची निर्मिती

5.    ऑक्सिजन               (         )                . पाऊस

6.    बाष्प                     (         )                . वनस्पती अन्ननिर्मिती

7.    सूक्ष्मजीव                 (         )                . ज्वलन

          उत्तर:

           1.    उखळीचा सांधा           खांदा

2.    बिजागरीचा सांधा    गुडघा 

3.    सरकता सांधा            मनगट

4.    कार्बन डायॉक्साइड    वनस्पती  अन्ननिर्मिती 

5.    ऑक्सिजन                 . ज्वलन         

6.    बाष्प                         पाऊस           

7.    सूक्ष्मजीव                   मृदेची निर्मिती  

प्रश्न 2. . चूक की बरोबर ते लिहा.

1.   जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल असे म्हणतात. बरोबर

2.    रेडॉनचा वापर जाहिरातींसाठीच्या दिव्यांत करतात. चूक

3.    जमीन आणि मृदा ही एकच असते. चूक

4.    हाडांची रचना मऊ/मृदू असते.चूक

5.    मृदेचा 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. चूक

6.    मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतरेंद्रियांचे रक्षण करते. बरोबर

 

ब. मी कोण?  

. पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. मीठ / सोडियम

. माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही. उष्णता

. नाही मला आकार! द्रव / वायू

. तुमचा ताप मोजतो, तापमापीत असतो.पारा

 प्रश्न .अ. आमचे उपयोग काय आहेत ?

(1लाकूड.

    त्तर : लाकडापासून फर्निचर तयार करतात. घराच्या खिडक्या, दरवाजे इत्यादी लाकडापासून तयार                     करतात. त्यामुळे बांधकामातदेखील लाकडाचा मोठा उपयोग असतो. लाकडापासून इंधनही                         मिळते. लाकडाच्या अनेक वस्तू तयार करतात.

(2कागद.

उत्तर : कागदाचा वापर लिहिण्यासाठी होतो. वह्या-पुस्तके, ग्रीटिंग कार्डस् अशा गोष्टी कागदाच्याच असतात. टिश्यू पेपरचा वापर हात-तोंड पुसण्यासाठी होतो. पॅकिंगमध्येही कागदाचा वापर होतो.

(3) नायलॉन.

 उत्तर : नायलॉन धाग्यांचा टिकाऊ वस्त्रांसाठी उपयोग करतात. तसेच मासेमारीची जाळी आणि दोरखंड करण्यासाठीही नायलॉनचा वापर होतो.

(4) रबर.

उत्तर : रबरापासून वाहनांचे टायर्स बनवले जातात. यासाठी कठीण प्रतीचे रबर वापरले जाते. खोडरबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी, रबर बँड अशा अनेक वस्तू रबरापासून तयार केल्या जातात.

            (5माती

उत्तर : मातीवरती शेती होते. मातीचा उपयोग बांधकामात केला जातो. विटा व कौले मातीपासून तयार केली जातात. मातीची भांडी, माठ, चूल, कुंड्या अशा अनेक गोष्टी मातीपासून बनवल्या जातात.


ब. तापमानांची नोंद करा. 

       

काही उदाहरणे

तापमान सुमारे

उकळते पाणी

 1000C

गोठणारे पाणी

 00C

हवा (हिवाळ्यात रात्रीच्या वेळी)

150C 

हवा (उन्हाळ्यात भर दुपारी)

  > 350C

फ्रीजमधील तापमान

  < 50C

फ्रीजरमधील तापमान

< -180C 

मानवी शरीराचे तापमान

370C 

   


प्र. 3रा ) खालील प्रशनांची उततरे तुमचया शबदांत वलहा - 4

1.    कुकरची मूठ प्लॅस्टिकची का असते?

उत्तरकुकर हा हिंडालिअम या मिश्र धातूचा किंवा इतर धातूंचा बनलेला असतो. तो पेटत्या चुलीवर असला तर तापलेला असतो. चटकन उचलल्यास आपला हात भाजू शकतो. हे होऊ नये म्हणून त्याची मूठ प्लास्टिकची असते. प्लास्टिक हे उष्णतावाहक नसते. कुकर गरम असताना प्लास्टिकच्या मुठीमुळे तो उचलताना हात भाजत नाही.

    2.  नैसर्गिकरीत्या कोणकोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात?

उत्तरकापूस, लोकर, रेशीम, ताग, अंबाडी या पदार्थांपासून नैसर्गिकरीत्या धागे मिळतात.

3. हाडांचे प्रकार थकती कोणते?

उत्तरहाडांचे चार मुख्य प्रकार आहेत. हे प्रकार पुढीलप्रमाणे : () चपटी हाडे () लहान हाडे () अनियमित हाडे () लांब हाडे.

) कारणे लिहा : - 4

1.    कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.

उत्तरमृदेत विघटन करणारे जीवाणू आणि इतर सजीव असतात. त्यांच्यापासून मृतावशेषांचे रूपांतर खतात होते. अशा प्रक्रियेपासून कुथित मृदा नैसर्गिकरीत्या तयार होते. म्हणून कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे.

2.    मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे.

उत्तरमानवनिर्मित पदार्थ वापरण्यास सुलभ, कमी खर्चाचे आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. पूर्वीच्या नैसर्गिक पदार्थांना आता मानवनिर्मित पदार्थांचा पर्याय आहे. उदा., कापूस लोकर यांपासून बनवलेल्या वस्त्रांपेक्षा कृत्रिम धाग्यांची वस्त्रे अधिक सोयीची असतात. थर्माकोल आणि प्लास्टिक हे वजनाने हलके आणि सोयीचे असल्याने अशाच पदार्थांना जास्त मागणी आहे.

 

Maharashtra State Board Exercises ( Semi/Marathi)

5 वी परिसर अभ्यास - 1 5th EVS (Semi) 6th General Science (Semi) 7th General Science (Semi) 6वी सामान्य विज्ञान (मराठी माध्यम) 7 वी सामान्य व...