5 वी परिसर अभ्यास – 1 द्वितीय सत्र महत्वाची प्रश्नोत्तरे 2024-25

 

5 वी परिसर अभ्यास – 1 द्वितीय सत्र महत्वाची प्रश्नोत्तरे 2024-25

प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(1) निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते.

(2) तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेमध्येही, कर्करोग होऊ शकतो.

(3) अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.

(4) देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक.

(5) व्यक्तिगत आरोग्य सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते.

(6) ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवला जातो.

(7) जठर हे पिशवी सारखे इंद्रिय असते.

(8) जीवनसत्त्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते

(9) कॅल्शिअममुळे आपली हाडे मजबूत होतात

(10) गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात

(11) सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात.

प्रश्न 2. जोड्या लावा.

(1) फुप्फुसे                               - श्वसनसंस्था

(2) जठर                                   - पचनसंस्था

(3) हृदय                                   - रक्ताभिसरण

(4) मेंदू                                     - चेतासंस्था

 

(1) स्निग्ध पदार्थ                 - तेल 

(2) प्रथिने                        - कडधान्ये 

(3) जीवनसत्त्वे                   - धान्याचा कोंडा 

(4) खनिजे                       - लोह 

(5) पिष्टमय पदार्थ                - ज्वारी 

प्रश्न 2. पुढील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा

(1) प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार हे सामाजिक 

आरोग्य चांगले बनवतात.

उत्तर: चूक. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात

(2) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायदयाने मनाई केली आहे

उत्तर: बरोबर.

(3) पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते

उत्तर: बरोबर.

(4) आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही

उत्तर: चूक. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते.

(5) आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो

उत्तर: चूक.  आतड्याच्या रोगांचा प्रसार पाणी व अन्नातून होतो

(6)  काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात. 

उत्तर: चूक.  कोणताही रोग दैवी प्रकोपामुळे होतात. रोग रोगजंतूमुळे होतात.

(7) नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते.

उत्तर: बरोबर.

(8) जन्मतःच आपण कौशल्ये आत्मसात केलेली असतात.

उत्तर: चूक.  जन्मतःच आपण कौशल्ये आत्मसात केलेली नसतात.

(9) स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही.

उत्तर: बरोबर.  

(10) जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते.

उत्तर: चूक. आपली उंची 18 ते 25 वयापर्यंत वाढते.

(11) निर्जीव घटकांमध्ये मृत सजीवांचा समावेश होतो

उत्तर: बरोबर.

(12) जैवविविधता जपणे आवश्यक आहे

उत्तर: बरोबर.

प्रश्न ३. पुढील प्रत्येक अन्नघटकाचे दोन स्रोत सांगा

() खनिजे: पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये. 

() प्रथिने: पनीर, अंडी, मासे

() पिष्टमय पदार्थ: बटाटा, साबुदाणा, भातपोळी.

. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(1) कर्बोदके कशाला म्हणतात ?

उत्तर: शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट, शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कर्बोदके असे म्हणतात.

(2) कुपोषण कशाला म्हणतात?

उत्तर:  एखादया व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकांची कमतरता राहिली, तर शरीराचे योग्य पोषण होत नाही. याला कुपोषण असे म्हणतात. कुपोषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

(3) लसीकरण म्हणजे काय

उत्तर : शरीरामध्ये रोगप्रतिकारक्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जेव्हा लसी देण्यात येतात, तेव्हा त्याला लसीकरण असे म्हणतात. लसीकरण केल्यामुळे रोगजंतू शरीरात शिरल्यावरही आपले शरीर त्यांना प्रतिकार करते आपल्याला रोग होत नाही. यामुळे रोगप्रतिबंध आणि रोगप्रसारास आळा बसतो. छोट्या बाळांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना विविध रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते. साथीच्या संसर्गजन्य रोगास आळा बसण्यासाठी सामुदायिक लसीकरण करतात.

(4) नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा

उत्तर : (1) क्षयप्रतिबंधक लस (2) त्रिगुणी लस-यात घटसर्प, डांग्या खोकला धनुर्वात या रोगांच्या प्रतिबंधक लसी असतात. (3) तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओ प्रतिबंधक लस.

(5) शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा

उत्तर : श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, अस्थिसंस्था, उत्सर्जनसंस्था, चेतासंस्था इत्यादी शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे आहेत

(6) 'स्थलांतर' म्हणजे काय

उत्तर : प्राण्यांनी वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तात्पुरते किंवा कायम स्वरूपाचे जाणे याला 'स्थलांतर' असे म्हणतात.

(7) स्निग्ध पदार्थांची उदाहरणे लिहा. 

उत्तर: दुधावरची साय, लोणी, तूप, वनस्पतींपासून मिळणारी तेले, सुकामेवा, मांसातील चरबी, अंड्यातील पिवळा बलक ही स्निग्ध पदार्थांची उदाहरणे आहेत

(8) आनुवंशिकता म्हणजे काय

उत्तर : आपल्या आईवडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मतःच येणे, याला आनुवंशिकता असे म्हणतात

(9) ऊर्जा कशाला म्हणतात

उत्तर: कार्य करणाऱ्या पदार्थाच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात.

(10) तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते?

उत्तर: (1) तंबाखूसेवनाने तोंडात व्रण पडतात. त्यांच्या मोठ्या जखमा होऊन नंतर गाठी होतात. (2) तोंडामध्ये कर्करोगाचा त्रास सुरू होतो. (3) तंबाखू पोटात गेला तर अन्ननलिकेचाही कर्करोग होतो. पोटाच्या इतर तक्रारीदेखील सुरू होतात. (4) कर्करोगाच्या औषधोपचाराचाही त्रास होतो. बऱ्याचदा मृत्यू संभवतो.

(11) मदयपानाचे घातक परिणाम कोणते?

उत्तर: (1) मदयपानाचा पहिला परिणाम मेंदूवर होतो. गुंगी येऊन मेंदूवरील नियंत्रण ढळते. आपल्या इच्छेनुसार हालचाली करता येत नाहीत.

(2) यकृत, आतडी, वृक्क (किडनी) आणि मूत्राशयाचे विकार जडतात. यकृताचा कर्करोग संभवतो.

Maharashtra State Board Exercises ( Semi/Marathi)

5 वी परिसर अभ्यास - 1 5th EVS (Semi) 6th General Science (Semi) 7th General Science (Semi) 6वी सामान्य विज्ञान (मराठी माध्यम) 7 वी सामान्य व...